वडगाव मावळ, ता.२१: कशाळ येथील शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नरेश जाधव यांचे चिरंजीव रिद्धेश व सिद्धेश यांच्या वाढदिवसाचा कुठलाही अनाठायी खर्च न करता आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त पाणी बॉटल व पेनचे वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
यावेळी जाधव बोलतांना म्हणाले समितीवर निवड झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये कशी वाढ होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येणाऱ्या काळात विविध उपक्रम राबविले जाईल.

यावेळी माजी आदर्श सरपंच व शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शरद जाधव, विद्यमान शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नरेश जाधव, शालेय व्यवस्थापन समिती माजी उपाध्यक्ष रामकृष्ण जाधव, मोरे सर,औटी मॅडम,इंगळे मॅडम, सोशल मीडियाचे उपाध्यक्ष मंगेश जाधव, श्री मळूबाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल जाधव,माजी सदस्य संजय जाधव, विराट जाधव,प्रवीण जाधव,रुपेश जाधव,दर्शन जाधव आदी विद्यार्थी उपस्थित होते.


